जुन्या झालेल्या बिल्डिंगमधील प्रत्येक रहिवाशाचे आपल्या बिल्डिंगचे रीडेव्हलपमेन्ट व्हावे असे स्वप्न असते पण हे स्वप्न साकरणे मात्र फार सोपे नसते.
रीडेव्हलपमेन्ट प्रक्रियेमध्ये अनेकदा सभासदांमध्ये वाद होतात आणि त्यामुळे सर्व प्रक्रिया रखडते.
ह्या वादाची प्रमुख कारणे :
– कमिटीने सभासदांना विश्वासात न घेणे
– मनमानी पद्धतीने निर्णय घेणे
– मूठभर सभासदांचे हित जपण्यासाठी इतर सभासदांवर अन्याय करणे
– बिल्डरशी संगनमत करून निवडक लोकांनी अधिक फायदा मिळवणे.
एकंदरीत कमिटीच्या कामकाजात पारदर्शकता नसणे हे ह्या वादामागील प्रमुख कारण असते, अर्थात प्रत्येकवेळी हे असेच असते असे नाही. काही वेळा कमिटी मेम्बर्स सचोटीने काम करत असूनही काही हेकेखोर आणि स्वार्थी मेम्बर्स जाणूनबुजून कामात अडथळा आणतात.
काही वेळा बिल्डिंग मधील रहिवाशांच्या आवास्तव मागाण्यांमुळे देखील बिल्डरसाठी प्रोजेक्ट फिजिबल रहात नाही आणि रीडेव्हलपमेन्ट रखडते.
रीडेव्हलपमेन्ट प्रक्रियेत संदर्भात वारंवार तक्रारी आल्यामुळे महाराष्ट्र सरकारने 2019 साली रीडेव्हलपमेन्ट साठी सुधातीत मार्गदर्शक तत्वे / नियमावली जाहीर केली आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊया
– एकूण सभासदांपैकी 1/5 सभासदांनी मॅनेजिंग कमिटीच्या सेक्रेटरीकडे रिडेव्हलपमेंटसाठी पत्र देऊन विशेष सवर्साधारण सभेची मागणी करावी
– असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर मॅनेजिंग कमिटीने त्यावर चर्चा करून 2 महिन्यांच्या आत विशेष सवर्साधारण सभा बोलवावी
– सभेचा अजेंडा 14 दिवस आधी सर्व सभासदांना देण्यात यावा
– सभेच्या आधी किमान 3 अनुभवी आर्किटेक्टस / प्रोजेक्ट मॅनजेमेंट कन्सल्टन्ट यांचे सल्लागार म्हणून काम कारण्यासाठी कोटेशन घ्यावे
– सर्वसाधारण सभेसाठी एकूण सभासद संख्येच्या 2/3 इतका कोरम असणे आवश्यक आहे.
– सभेमध्ये सभासदांनी रिडेव्हल्पमेंट बाबतीतील मांडलेल्या हरकती, सूचना ह्या त्यांच्या नावासह मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये नोंदवाव्या
– रिडेव्हल्पमेंटचा निर्णय घेण्यासाठी एकूण सभासदांपैकी (उपस्थित सभासदांपैकी नव्हे) 51% सभासदांचे बहुमत असणे गरजेचे आहे
– ह्याच मिटिंग मध्ये सल्लागारांकडून आलेली कोटेशन्स सभासदांसमोर मांडून बहुमताने सल्लागाराची नेमणूक करावी.
सभेचा वृत्तांत सर्व सभासदांना पुढील 7 दिवसात मिळेल ह्याची सोय करावी.
नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या मदतीने रीडेव्हलपमेन्ट ची प्रोसेस कशी पुढे घेऊन जावी ह्याविषयी पुढील लेखामध्ये पाहू.
मनीष बेदरकर
आर्किटेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्ट, रीडेव्हलपर
No comments:
Post a Comment